Ganeshotsav | अकोल्यात गणेशोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; रोबोटच्या माध्यमातून गणेशमूर्तीची पूजा

अकोल्यात गणेशोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड रोबोटच्या माध्यमातून गणेशमूर्तीची पूजा करण्यात आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

अकोल्यात गणेशोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड रोबोटच्या माध्यमातून गणेशमूर्तीची पूजा करण्यात आलेली आहे. अकोल्यातील गणेशोत्सवात हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आय टी एस टेक्निकल लर्निंग केंद्राच्या वतीन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही वेगळी थीम अकोल्यात करण्यात आलेली आहे.

रोबोटीक्सचा वापर करून आपण गणपतीची आरती आणि आराधना करावी आणि या माध्यमातून लोकांना गणपती बाप्पाचा जो आशीर्वाद आणि प्रसाद आहे तो सगळ्यांपर्यंत पोहचवावा असाच तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि आपला देश विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहचवावे हा या केंद्राचा संकल्प आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com